buldhana police arrests four along with weapons Saam Digital
क्राईम

बुलढाणा : शस्त्रांसह चौघा परप्रांतीयाना अटक, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात पाेलिसांची कारवाई

Buldhana Crime News : लोकसभेच्या धामधुमीत शस्त्र तस्करीला वेग आला आहे. पोलिस निवडणूक निमित्त व्यस्त असल्याने हा गोरखधंदा फोफावला आहे. सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल दरम्यान माेठी कारवाई केली.

संजय जाधव

Buldhana :

बुलढाणा व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत ४ पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. या प्रकरणी परराज्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेच्या धामधुमीत शस्त्र तस्करीला वेग आला आहे. पोलिस निवडणूक निमित्त व्यस्त असल्याने हा गोरखधंदा फोफावला आहे. अश्याच एका कारवाईत सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल दरम्यान कारवाई केली.

सापळा रचून केलेल्या या कारवाईत पिस्टलचा सौदा करण्याच्या बेतात असलेल्या चोघांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या जवळून ४ पिस्टल, मॅगझीन सह १७ जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा २ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोघांची कसून चौकशी करण्यात आली. ते मध्यप्रदेशचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार ( दोन्ही राहणार पाचोरी तहसिल खकणार जिल्हा बऱ्हाणपूर), आकाश मुरलीधर मेश्राम, ( करूनासागर , बालाघाट) संदीप डोंगरे ( आमगाव बालाघाट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Maharashtra News)

त्यांच्या विरुद्ध शस्त्र कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रकांत पाटील, सहकारी विनोद शिंबरे, विशाल गवई, मोईनुध्धीन सैय्यद, राहुल पवार, गणेश मोरखडे यांनी ही कारवाई केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT