honor killing SAAM DIGITAL
क्राईम

Buldhana : बुलढाण्यात सैराट! बहिणीबरोबर प्रेमसंबंध, संतापलेल्या भावाने मित्राचा जीव घेतला

Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात 'ऑनर किलिंग'चा प्रकार उघडकीस आलाय. बहिणीच्या बदनामीमुळे भावाने युवकाला संपवलले. यामुळे मलकापूर नगरी अक्षरशः हादरल्याचे चित्र आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana honor killing: मलकापूर येथे कथित प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. ही हत्या 'त्या' युवतीच्या भावाने केल्याचे उघड झालेय. पोलिसांनी भावाला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर त्याने मृताच्या भावाला माहिती दिली होती. या घटनेमुळ मलकापूर अक्षरशः हादरल्याचे चित्र आहे.

युवतीचा भावाने २१ वर्षीय तरुणाने २७ वर्षीय तरुणाचा खून केला. प्रवीण अजाबराव संबारे (२७, राहणार बेलाड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा ) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांचा भाऊ सचिन संबारे याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण संबारे हा दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या एका मित्राने प्रवीणच्या भावाला फोनवरून दिली. मिळालेल्या माहितीवरून प्रवीणचा भाऊ सचिन हा मलकापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे पोहोचला. तिथे त्याला प्रवीण बेशुद्ध अवस्थेत दिसला. प्रवीणला उपचारासाठी मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवले, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले.

दरम्यान, सर्व कायदेशीर सोपस्कार पर पडल्यावर प्रवीण याच्या मृतदेहवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर प्रवीणचा भाऊ सचिन याने आदल्या दिवशी रात्री आलेल्या फोनचे 'कॉल रेकॉर्डिंग'वारंवार ऐकले. प्रवीण सोबत आदल्या दिवशी रात्री जो मित्र होता, ज्याने फोन करून प्रवीण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिली होती, त्यावरच प्रवीणच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. प्रवीणच्या कुटुंबीयांनी लगेच पोलीस ठाणे गाठत प्रवीण चा खून झाल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी वैभव गोपाळ सोनार (२१) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आधी उडवा उडवीचे उत्तरे देणाऱ्या वैभवने रुमालाने नाक आणि तोंड दाबून प्रवीण ची हत्या केल्याची कबुली दिली. वैभव सोनार याने प्रवीणचा खून करण्याचे कारण सांगितले. मृतक प्रवीण हा वैभवच्या बहिणीवर कथितरित्या प्रेम करत होता. त्यामुळे वैभवचे कुटुंब देखील त्रस्त होते. प्रवीणच्या या कृत्यला कंटाळूनच त्याचा काटा काढायचा विचार वैभवच्या डोक्यात होता. म्हणून त्याचा खून केला अशी कबुली दिली आहे. त्यानुसार मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी गजाआड केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT