Buldhana Crime Saam tv
क्राईम

Buldhana Crime News: भरदिवसा युवकाची हत्या, संत नगरी शेगाव हादरलं

Youth Killed Broad Daylight : बुलढाण्यातील शेगाव येथे एका युवकाच्या हत्येची घटना घडली आहे. नितीन गायकवाड या तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आलीय. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • शेगाव शहरातील चिंच परिसरात युवकाची हत्या झाली आहे.

  • शेगाव पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • भरदिवसा हत्या झाल्याने संत नगरी शेगाव हादरलंय.

संजय जाधव, साम प्रतिनिधी

बुलढाण्यातील शेगाव शहरातील चिंच परिसरात युवकाची हत्या झालीय. नितीन गायकवाड असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नावं आहे. नितीन गायकवाड मूळचा वाशीम येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र त्याची हत्या कोणी व कशासाठी केली याचा शोध आता शेगाव शहर पोलीस घेत आहेत. सध्या शेगाव शहरात दिवाळीच्या सुट्यामुळे लाखो भविकांची गर्दी आहे. मात्र हत्येच्या घटनेमुळे भविकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

भरदिवसा बायकोवर कोयत्याने वार

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बियोरा शहरात एका मद्यधुंद व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या बायकोवर कोयत्याने हल्ला करत तिचे दोन्ही हात कापले. ही संपूर्ण घटना बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कोळी मोहल्ल्यात राहणाऱ्या सविता शाक्यवार या कामावरून परतत असताना, ज्योती कॉन्व्हेंट शाळेजवळ अचानक तिचा नवरा तिच्या मागे आला आणि कोयत्याने तिला बेदम मारहाण करत दोन्ही हातावर वार केले. त्यामुळे तिचे हात कापले गेल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. हल्ल्याच्या वेळी उपस्थित नागरिकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली.

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील सविता शाक्यवार यांना बेवार येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती पत्नीसह मुलाचा मृत्यू

Crime: अनैतिक संबंधासाठी बायकोचं हादरवणारं कृत्य, बॉयफ्रेंडच्या मदतीने भररस्त्यात गळा चिरला अन्...

Nashik Crime: ६४ वर्षीय व्यक्तीचे अश्लील चाळे, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; मालेगावनंतर मनमाड हादरलं

Sheera Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा मऊसूत तुपाचा शिरा, वाचा खास रेसिपी

Early Dinner: रोज रात्री लवकर जेवण केल्याने शरीरात होतील 'हे' बदल, आजपासूनच लावा 'ही' सवय

SCROLL FOR NEXT