Buldhana Crime News Saam Digital
क्राईम

Buldhana Crime News: निर्दयीपणाचा कळस, एक दिवसाच्या बाळाला दिले फेकून, उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एका उच्चभ्रू वस्तीत मातृत्वाला काळीमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्दयी आईनेच आपल्या एक दिवसांच्या जिवंत अर्भकाला फेकून दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Buldhana Crime News

संजय जाधव

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एका उच्चभ्रू वस्तीत मातृत्वाला काळीमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्दयी आईनेच आपल्या एक दिवसांच्या जिवंत अर्भकाला फेकून दिले आहे. धक्कादायक म्हणजे या स्री जातीच्या अर्भकाचा एक पाय कापलेल्या स्थितीत आढळून आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील रेल्वे रूळानजीक असलेल्या लखपती गल्लीत रस्त्याच्या बाजूला स्री जातीचे अर्भक आढळून आले होते. धक्कादायक म्हणजे अर्भकाचा एक पाय कापलेल्या स्थितीत होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणी मृत अर्भक ताब्यात घेतले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आल्यामुळे ते निर्जनस्थळी फेकून दिले असावे, असा संशय पोलिसांना आहे. तसेच बाळाला रात्री या ठिकाणी फेकून दिल्यानंतर कुत्र्यांनी बाळाच्या पायाचे लचके तोडले असावेत असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आईनेच पोटच्या मुलाला अशा प्रकारे फेकून दिल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून या संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास शेगाव शहर पोलीस स्थानकात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात दाखवला छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास; थेट शाळेवर गुन्हा दाखल,नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

SCROLL FOR NEXT