Buldhana Latest News:  Saamtv
क्राईम

Buldhana Crime: शटर उचकटून आत शिरले, तब्बल १३ लाखांचे दागिने लुटले, बुलढाण्यात जबरी चोरी, घटना CCTVत कैद!

Buldhana Latest News: या सराफा दुकानातून चोरट्यांनी १३ लाखांचे दागिने लंपास केले असून चोरट्यांची ही चोरी दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २५ ऑगस्ट २०२४

बुलढाण्यामधून एक चोरीची मोठी घटना समोर आली आहे. बुलढाण्यामधील मेहकर येथील सराफा दुकानात जबरी चोरी झाली असून तब्बल १३ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरामध्ये सराफाच्या दुकानात मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे. सराफा व्यावसायिक कैलास धानुका यांचे मथुरा ज्वेलर्स या दुकानात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या सराफा दुकानातून चोरट्यांनी १३ लाखांचे दागिने लंपास केले असून चोरट्यांची ही चोरी दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सायंकाळी दुकान मालक कैलास धाणुका यांनी दुकान बंद करून घरी गेले होते, मात्र सकाळीच ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला की दुकानाचे शटर उघडे आहे. कैलास यांनी दुकानात जाऊन पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचे समजले. यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेने व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी कारवाईचे मोहीम हाती घेतली आहे. नांदेड शहरातील नामांकित असलेले सिटी सिन्फनीत हॉटेल मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार खेळताना नऊ जणांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख चौदा हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT