Crime News Saam Tv
क्राईम

Buldhana Crime: महिलांशी अश्लील वर्तन; नराधमाला शिकवला चांगलाच धडा, भररस्त्यात गळ्यात चपलांचा हार टाकत बेदम चोपलं

Misbehaved With Women: महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rohini Gudaghe

Buldhana Crime News Video Viral

महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या नराधमाला महिलांनी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात चांगला धडा शिकवला आहे. शेगाव (Shegaon) येथील दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

महिला मुलींशी अश्लील वर्तन (Misbehaved With Women) करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. त्याच्या गळ्यात चपलेचा हार टाकल्याची घटना शेगावमध्ये घडली आहे. आता या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अशी' घडली घटना

हा व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील आहे. त्याचं नाव ज्ञानेश्वर कुकडे असल्याची माहिती मिळत आहे. त्याचं शेगाव शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे. या ठिकाणी अनेक मुली-महिला गाडी शिकण्यासाठी येतात. तेथे येणाऱ्या महिला-मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत (Buldhana Crime) होता. यामुळे महिलांमध्ये चांगलंच भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.

दिवसेंदिवस या नराधमाची मजल वाढत होती. पण भितीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. आता एका पीडित मुलीने काही महिलांसह त्याला भररस्त्यात झोप दिल्याची घटना घडली आहे. त्याच्या गळ्यात चपलेचा हार ( shoes necklace) टाकून त्याला पोलीस स्टेशनपर्यंत नेलं आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी चांगली समज दिली

मात्र संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि कुटुंबातील व्यक्तींनी विनंती केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला चांगली समज दिलीय. त्याच्याकडून 'पुन्हा अशी चुक करणार नाही' असं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं आहे. हे प्रकरण आपसात मिटवल्याची माहिती मिळतेय. मात्र, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महिलांकडे वाईट नजरेने पाहणे, छेडछाड, कारण नसताना डोकावणे, त्यांच्यावर नजर ठेवून असणे, पाठलाग करणे या बाबी असामाजिक आणि बेकायदा आहेत. अशा प्रकारचं वर्तन केल्यास कायद्याने शिक्षा होऊ (Crime News) शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

Surat Bus Accident: सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT