Buldhana crime Saam Tv
क्राईम

Buldhana Crime: 'तुझ्या मुलाला पास करतो, तू फक्त खूश कर', शिक्षकांकडून विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार; बुलडाणा हादरले

Buldhana Police: बुलडाण्यामध्ये शिक्षकांनीच विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बुलडाण्यात खळबळ उडाली.

Priya More

बुलडाण्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये ही घटना घडली आहे. मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असे म्हणत आरोपी शिक्षकांनी महिलेवर बळजबरी करत बलात्कार केला. याप्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

'तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू, यासाठी तू फक्त आम्हाला खूश कर, अशी शरीरसुखाची मागणी दोन वर्ग शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईकडे केली. या दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर वारंवार बलात्कार केला. या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे या दोन्ही शिक्षकांनी ते शिकवत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्याच्या ३४ वर्षीय आईला आमिष दाखवून बळजबरीने वेळोवेळी बलात्कार केला. तसेच त्या दोघांना खूश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT