Buldhana Crime News Saam tv
क्राईम

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, काकाने पुतण्याचा झोपेतच काटा काढला; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात घरगुती वादातून काकाने पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे

Alisha Khedekar

  • घरगुती वादातून काकाने केली पुतण्याची हत्या

  • झोपेत असताना कुऱ्हाडीने प्राणघातक वार

  • घटनेनंतर आरोपी फरार; पोलिसांनी काही तासांत अटक केली

  • चिखली तालुक्यातील हातनी गावात खळबळ

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून चक्क काकाने पुतण्याची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सदर घटना बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील हातनी गावामध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव असे आरोपीचे नाव असून त्याच्या पुतण्याचे नाव गोपाल अजबराव जाधव असे होते. काल सायंकाळी विनोद आणि गोपालमध्ये किरकोळ कारणावरून कडाक्याचं भांडण झालं.

त्यानंतर दोघेही झोपण्यासाठी गेले. मात्र विनोदच्या पोटात राग खदखदत होता. त्याच संतापात त्याने झोपलेल्या गोपालच्या डोक्यात आणि छातीवर कुऱ्हाडीने वार केले. या मारहाणीत गोपाल गंभीर जखमी झाला. कुऱ्हाडीचे वार खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे गोपाल जाधवचा जागीच मृत्यू झाला.

यातनेने विव्हळत असलेल्या पुतण्याची काकाला जरासुद्धा दया आली नाही. या घटनेनंतर आरोपी विनोद जाधव हा राहत्या घरातून फरार झाला होता. मात्र कानून के हाथ लंबे होते है, त्यापासून कोणीच वाचू शकत नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Habits: आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या या ६ सवयी आत्ताच सोडा

कोण आहेत संदीप कर्णिक? डॅशिंग IPS अधिकाऱ्यांनी TCS धर्मांतर आणि अशोक खरात प्रकरण कसं उघडकीस आणलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maharashtra News Live Update: उरण येथील लॉजिस्टिक्स कपंनीला इथे मोठा स्फोट

Crime: पंढरपूर हादरले! सख्ख्या बहिणीकडून भावाची हत्या; ओढणीने गळा आवळला, नंतर मृतदेह शेतात नेऊन टाकला

Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT