brother and sister dies in nimbohre near phaltan Saam Digital
क्राईम

Satara: दुहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला, बहिण भावाचा मृत्यू, निंभाेरेत खळबळ

Satara Crime: सध्या घटनेची कसून चाैकशी सुरु आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

संभाजी थोरात

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील निंभोरे गावामध्ये दुहेरी खूनाची घटना घडल्याचे समाेर आले आहे. बहिण आणि भावाचा खून झाल्याने निंभाेरे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

फलटण ग्रामीण पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सीकाबाई तुकाराम शिंदे (वय 30) आणि सुमित तुकाराम शिंदे (वय 16) असे खून झालेल्यांची नाव आहे. हे दोघे भाऊ बहिण आहेत असेही पाेलिसांनी नमूद केले.

या घटनेतील दोन्ही मृत पारधी समाजातील आहेत. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पाेलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेची कसून चाैकशी सुरु आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

अभिजित दिपकेंवर गुन्हा दाखल, मुंबईतील विनापरवानगी आंदोलन भोवले; पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT