Bollywood Actress Molest yandex
क्राईम

Bollywood Actress Molest: प्रसिद्ध अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड त्रास; पाठवायचा नको ते व्हिडिओ

actress molested in Pune : प्रसिद्ध अभिनेत्रीला एका आरोपीने सोशल मीडियावर प्रचंड त्रास दिला. तिला नको ते व्हिडिओ पाठवायचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मोठ्या संकटात अडकली. या प्रसिद्ध अभिनेत्रीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनुसार पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचे नाव रघुवीर सिंग गुजर असे आहे.

आरोपी हा राजस्थानचा राहणारा आहे. हा आरोपी अभिनेत्रीला सोशल मीडियावर धमकी देत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. हा आरोपी अभिनेत्रीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत नजर ठेवून होता. याआधी पुण्यात या दोघांची भेट सुद्धा झाली होती. हा गुन्हेगार अभिनेत्रीचा चाहता होता, अशी माहिती आहे.

पुढे भेट झाल्यानंतर हा आरोपी अभिनेत्रीला सतत भेटवस्तू पाठवायचा. पुढे त्याने कहर केला, त्याने अभिनेत्रीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावर अभिनेत्रीने नकार दिल्यास तिला सोशल मीडियातून अश्रील चित्रफीत आणि फोटो पाठवायचा. त्यावर अभिनेत्रीने आरोपीविरोधात स्वारगेट पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान अनेक अभिनेत्रींसोबत अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले तरी, त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत कमेंट्स केल्या जातात. अनेकदा त्यांचे फोटो मॉर्फ केले जातात. त्यामुळे बऱ्याच अभिनेत्रींना या त्रासाला सामोरे जावे लागत असून, असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल काही काळासाठी बंद राहणार

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT