Crime News 
क्राईम

BMC अधिकारी ACB च्या जाळ्यात, लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडले

मुंबईत बीएमसीच्या तिघा कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात पकडलं आहे. अंधेरी पश्चिमेतील सायबर कॅफेमध्ये १५ हजारांची लाच घेताना बीएमसी अधिकारी आणि दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime : मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंधेरी (पश्चिम) येथे राबवलेल्या सापळा कारवाईत बीएमसीच्या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. मुंबईतील के/वेस्ट वॉर्डमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तक्रारदार महिला (वय 60) यांच्या दुकानावर बीएमसी अ‍ॅक्ट 1888 अंतर्गत कलम 313 नुसार कारवाईची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी आरोपी निरीक्षक अविनाश शांताराम कांबळे (52) यांनी सुरुवातीला ₹20,000 आणि नंतर तडजोडीनंतर ₹15,000 लाचेची मागणी केली होती

तक्रारदार 60 वर्षीय महिला असून त्यांचे डी.एन. नगर, अंधेरी (पश्चिम) येथे दुकान आहे. हे दुकान त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेले आहे. संबंधित दुकानावर बीएमसी अ‍ॅक्ट 1888 अंतर्गत कलम 313 नुसार कारवाई होणार असल्याचे सांगून निरीक्षक अविनाश शांताराम कांबळे (वय 52) यांनी कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 15,000 रुपये रकमेवर सौदा ठरला.

लाच स्वीकारण्याची जबाबदारी कांबळे यांनी शिपाई प्रदीप प्रभाकर खंडागळे (34) यांच्याकडे सोपवली होती. खंडागळे यांनी लाच रक्कम खाजगी इसम राजू अर्जुन देठे (44), सहेली सायबर कॅफे, अंधेरी पश्चिम यांच्यामार्फत स्वीकारण्याचे सांगितले. आज सायबर कॅफेमध्ये पंचासमक्ष देठे यांनी 15,000 रुपये ची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने तिन्ही आरोपींना रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 33/25 भा.दं.वि. कलम 7, 7A आणि 12 अंतर्गत नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सुनयना सोनावणे करीत आहेत.

या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले यांनी केले असून, तपास पोलीस निरीक्षक सुनयना सोनावणे करत आहेत. मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उप आयुक्त अनिल घेरडीकर आणि राजेंद्र सांगळे यांनी केले आहे. सक्षम अधिकारी म्हणून मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचा समावेश आहे.

लाचलुचपत विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती लाच मागत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

SCROLL FOR NEXT