Patana Crime Saam Tv
क्राईम

Crime: हॉटेलमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आठवी-दहावीतील ४ विद्यार्थ्यांचं भयंकर कृत्य

Patana Crime: बिहारच्या पटनामध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. ही मुलगी १५ वर्षांची आहे. बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांनी हे धक्कादायक कृत्य केले. आरोपी आठवी -दहावीचे विद्यार्थी आहेत.

Priya More

बिहारच्या पटनामध्ये १५ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार शाळकरी मुलांनी हे धक्कादायक कृत्य केले. या प्रकरणी पीडित मुलीने पटनाच्या कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चारही आरोपी अल्पवयीन असून ते आठवी आणि दहावीमध्ये शिकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची इन्स्टाग्रामवरून एका मुलासोबत ओळख झाली. त्यांची मैत्री इतकी वाढली की ते नेहमी इन्स्टावर बोलू लागले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या मुलाने आपल्या इतर मित्रांसोबत या मुलीची ओळख करून दिली. १ महिन्यापूर्वी ही मुलगी दीपनगरमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली होती. याठिकाणी दोघांनी शरीरसंबंध बनवले. त्यानंतर ते पुन्हा भेटले. मंगळवारी हा मुलगा या मुलीला घेऊन एका हॉटेलवर गेला. त्याठिकाणी त्याचे मित्र आधीच आले होते. या सर्वांनी या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.

पीडित मुलीने हॉटेलमधून घर गाठले. तिने घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. हे ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चारही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. ही चारही मुलं देखील शिक्षण घेत आहेत. ते अल्पवयीन असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT