Bihar news Saam Tv
क्राईम

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

Bihar News : बिहारमधील जमुई येथे मुलगा व्हावा या हव्यासापोटी एका नराधम बापाने स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केली.

Alisha Khedekar

  • बिहारच्या जमुई जिल्ह्यात नराधम बापाने लेकीची हत्या केली.

  • मुलगा न झाल्याने आरोपी मन्नू चौधरीने दीड वर्षांच्या मुलीला गळा दाबून ठार केले.

  • आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

  • घटनेमुळे समाजात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

एकीकडे 'मुलगी वाचवा मुलगी शिकवा' च्या घोषणा दिल्या जातात. ,मात्र दुसरीकडे तिचं मुलगी नकोशी असल्यामुळे तिला जीवे मारलं जात. वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी पणतीला उजळू दिलं जात नाही. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. जन्मदात्याने मुलाच्या हव्यासापोटी जन्माला आलेल्या मुलीला गळा दाबून जीवे मारले आहे.

बिहारमधील जमुई येथील सिकंदरा नगर परिसरातील पुराणी चौकात शुक्रवारी मन्नू चौधरी या नराधम बापाने दीड वर्षाच्या मुलीला जीवे मारलं आहे. तो पुराणी चौकातील रहिवासी आहे. मुलगा व्हावा या इच्छेपोटी त्याने त्याची दीड वर्षांची निष्पाप मुलगी अनुराधा उर्फ ​​लाडो हिची हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.

मुलीची आई पूनम कुमारी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या शुक्रवारी सकाळी भांडी धुत होती. त्यानंतर तिचा पती मन्नू चौधरीने तिला ढकलून खाली पाडले आणि तिची दीड वर्षांची मुलगी लाडोचा गळा दाबून खून केला. तिने गोंधळ घातला तेव्हा आजूबाजूचे लोक जमले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी मन्नू चौधरीला अटक केली. महिलेने तक्रार केली आहे की मुलीची हत्या तिच्या पतीनेच केली आहे. तिला मुलगा नसल्याने ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : भिवंडीत तुफान हाणामारी, दुचाकीच्या वादावरून तरुणाला चोपलं, वाचवायला आलेल्या कुटुंबियांवर हल्ला

पुण्यात विषारी दारूकांड! मृतांचा आकडा २२ वर पोहोचला; प्रशासनाकडून मदत जाहीर, मृत्यूतांडवाला जबाबदार कोण?

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

SCROLL FOR NEXT