Bihar Crime News Saam tv
क्राईम

Bihar Crime: भाजीसाठी मोठा बटाटा का घेतला? नवरा-बायकोमध्ये वाद पेटला, कुऱ्हाडीने पत्नीचा गळा चिरला

Bihar Crime News: बटाटा चिरण्यावरून नवरा बायकोमध्ये वाद झाला त्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केलीय. किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडली.

Bharat Jadhav

किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दोन्ही नवरा-बायकोमधील वादाचं क्षुल्लक कारण होतं बटाटा. भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून नवऱ्याला राग अनावर झाला. त्याने मागचा पुढचा विचार न करता सपासप वार करत पत्नीचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना घडलीय, बिहारमधील मधुबन जिल्ह्यात. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजलीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोनी देवी (वय २५) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर या महिलेचं चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं. विशेष म्हणजे तिने सहा पुर्वीच ती आई झाली होती. ज्या दिवशी तिची हत्या झाली त्यादिवशी दोन्ही नवरा-बायकोमध्ये वाद झाला होता. हा वाद अगदी एक क्षुल्लक कारणामुळे झाला होता. हा वाद भाजीसाठी मोठा बटाटा का घेतला? यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यात आरोपी पतीला राग अनावर झाला त्याने पत्नीची हत्या केली.

रागच्या भरात पतीने त्याच्या जवळ असलेली कुऱ्हाड हातात घेतली आणि मागचा पुढचा विचार करता त्याने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले, यात सोनी देवी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न कलेा होता.

या प्रकरणात काहीजणांनी आरोपीला मदत केली त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. एफएसएळ टीम याप्रकरणी तपास करत आहे. पोलिसांनी घटनास्थळीवरून कु्ऱ्हाड जप्त केलीय. आरोपी दिल्ली येथील एका खासगी कंपनीत काम करत होता.

झोपेत असलेल्या बायकोवर कुऱ्हाडीने वार

चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली होती. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रफुल्ल गौतम टिपले असं आरोपीचे नाव आहे. प्रफुल्लने बायकोच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT