Bihar Crime News Saam tv
क्राईम

Bihar Crime: खळबळजनक! बेपत्ता तरुणाचा कॉंग्रेस आमदाराच्या घरात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

Bihar News: पियुष कुमार उर्फ ​​सुद्दू असे २४ वर्षीय तरुणाचे नाव असून परिसरातील नागरिकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Bihar Crime News:

बिहारमधील नवादा येथील काँग्रेस आमदाराच्या घरात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिसुआ येथील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांच्या घरात तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पियुष सिंह उर्फ ​​सुद्दू असे २४ वर्षीय तरुणाचे नाव असून परिसरातील नागरिकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हिसुआ (Bihar) विधानसभेच्या नरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पियुष सिंह शनिवारी ( २८ ऑक्टोबर ) सायंकाळी ७ वाजता आमदार नितू सिंहचा पुतण्या गोलू सिंहकडे गेला होता. ज्यानंतर तो घरी परतलाच नाही. शोधाशोध केली असता त्याचा मृतदेहच आमदाराच्या निवासस्थानात आढळला.

घटनेची माहिती मिळताच नवादाचे एसपी अंबरीश राहुल, राजौलीचे एसडीपीओ पंकज कुमार आणि मेस्कौर पोलीस स्टेशन आमदारांच्या घरी पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी एफएसएल आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, पियुषच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की आमदार 25 ऑक्टोबरपासून पाटण्यात होते आणि घर रिकामे होते. घटनेदिवशी आमदारांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. प्राथमिक तपासात गोलू सिंहने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT