Bhandara Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, खोलीत बॉयफ्रेंडसोबत होते ४ मित्र; मुलीसोबत केलं भयंकर कृत्य, मधेपुरा हादरलं

Bihar Crime News : बिहारमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या जबाबावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणी POCSO कायद्यांतर्गत तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • मंदिराजवळ बेशुद्ध अवस्थेत पीडिता सापडली

  • पीडितेच्या जबाबावरून एक आरोपी अटकेत

  • POCSO कायद्यांतर्गत गुन्हा; तपास वेगात

बिहारमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडने तिला घरी बोलावून मित्रांसमवेत सामूहिक बलात्कार केला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पीडित मुलगी एका मंदिराजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडली. शुद्धीवर येताच तरुणीने सांगितलेल्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मिळलेल्या माहितीनुसार, बिहारमधील मधेपुरा येथील सिंहेश्वर येथे रविवारी संध्याकाळी एका मंदिराजवळ एक अल्पवयीन विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळली. स्थानिकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उच्च रुग्णालयात रेफर करण्यात आलं.

दोन दिवस बेशुद्ध राहिल्यानंतर, पीडितेने पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. मुलीने बुधवारी सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडने तिला लग्नाचे आमिष दाखवून घरी बोलावले. त्यानंतर त्याच्या चार मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीच्या जबाबावरून रोशन कुमार या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेचा सखोल तपास पोलीस करत असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनमधील पँट्रीवाल्यांची गुंडगिरी! प्रवाशाला मार-मारलं; भांडण सोडवण्याऐवजी लोकांनी व्हिडिओ बनवला

Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य

नवऱ्याकडून हुंड्याची मागणी, रागाच्या भरात 4 महिने गरोदर कमांडो बायकोच्या डोक्यात घातलं डंबल अन्...

Rohit Shetty: रोहित शेट्टीने घेतली नवी लक्झरी कार; व्हिडिओ व्हायरल, किंमत ऐकून नेटकरी थक्क

Dandruff In Hair: केसांतील कोंडा कसा घालवायचा? महागड्या ट्रिटमेंटऐवजी घरीच करा 'हे' ५ सोपे उपाय!

SCROLL FOR NEXT