Crime x
क्राईम

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

Crime News : सावत्र आईसोबत अश्लील कृत्य करताना तरुणाला त्याच्या वडिलांनी पाहिले. रागाच्या भरात वडिलांनी टॉवेलने गळा आवळून मुलाला ठार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Yash Shirke

  • सावत्र आईसोबत अश्लील कृत्य केल्याने तरुणाची त्याच्या वडिलांनी गळा आवळून हत्या केली.

  • मृत तरुणाचे नाव पिंटू कुमार असून, त्याचे वडील श्याम राम यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • खूनानंतर मृतदेह गंगेत फेकण्यात आला होता, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Shocking : एक तरुण त्याच्या सावत्र आईसोबत अश्लील कृत्य करत होता. तरुणाच्या वडिलांनी त्याला असे करताना पाहिले. त्यानंतर रागाच्या भरात वडिलांनी तरुणाला ठार मारले. त्यानंतर वडिलांनी काही लोकांच्या मदतीने मुलाचा मृतदेह गंगेत फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारमधील शरीफ येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव पिंटू कुमार (२३ वर्षे) असे आहे. पिंटूच्या (आईचे वडील) आजोबांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याचे वडील श्याम राम यांना अटक करण्यात आली. पिंटू हा त्याच्या सावत्र आईसोबत अश्लील कृत्य करत असे, त्याच्या वडिलांनी हे पाहिल्यांनंतर पिंटूची हत्या झाली, अशी माहिती पिंटू कुमारची सावत्र आई, नीलू देवीने दिली आहे.

पिंटू कुमारचे वडील श्याम राम यांनी तीन वेळा लग्न केले. १९९९ मध्ये त्यांचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीपासून पिंटूचा जन्म झाला. २०१२ मध्ये श्याम रामच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली. त्याच वर्षी श्याम रामने दुसरे लग्न केले. दोन वर्षांनी २०१४ मध्ये दुसरी पत्नी घर सोडून पळून गेली. लगेच २०१४ मध्ये त्याने नीलू देवीशी तिसरे लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

श्याम राम हे दिल्लीत राहतात, तर पिंटू त्याच्या सावत्र आईसोबत मुधारी येथे राहतो. पिंटू अनेकदा त्याच्या सावत्रआईशी गैरवर्तन करायचा. १० ऑगस्टच्या रात्री त्याने नीलू देवीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हे पिंटूच्या वडिलांनी पाहिले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. श्याम रामने टॉवेलने गळा आवळून पिंटूचा खून केला. त्यानंतर काहीजणांच्या मदतीने मृतदेह गंगा नदीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी श्याम राम यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT