Bhopal Crime News Saam tv
क्राईम

Crime News: ट्रेन चुकली अन् घात झाला, पतीच्या नजरेसमोरच पत्नीवर सामूहिक अत्याचार; संतापजनक घटना

Bhopal Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते.

Satish Daud

Bhopal Crime News

गेल्या काही दिवसांपासून देशात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. एकीकडे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे भोपाळमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे दोन नराधमांनी पतीच्या नजरेसमोरच पत्नीवर सामूहिक अत्याचार केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भोपाळच्या (Bhopal) मुंगोली रेल्वे स्थानकावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांची ट्रेन होती. मात्र, उशीर झाल्याने ट्रेन चुकली. त्यामुळे रात्री उशीरा ते दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबले होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले. आपण रेल्वे पोलीस असल्याचं सांगत आरोपींनी त्यांच्याकडे तिकीट दाखवण्याची मागणी केली.

दोन्ही व्यक्ती सिव्हिल ट्रेसमध्ये असल्याने महिलेच्या पतीला संशय आला. त्यांनी आरोपींना तुमचे ओळखपत्र दाखवा मगच आम्ही तिकीट दाखवतो असे सांगितले. यावरून दोघांनीही महिलेच्या पतीला बेदम मारहाण (Crime News) केली. यातील एकाने महिलेला शेजारी असलेल्या झुडूपात नेले.

तिथे आरोपीने महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे जेव्हा आरोपी महिलेवर बलात्कार करीत होता. तेव्हा दुसरा आरोपी पतीला ते दृश्य दाखवत होता. दरम्यान, दुसऱ्या आरोपीने देखील महिलेवर बलात्कार केला.

घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर महिला आणि तिच्या पतीने तातडीने पोलिसांत (Police) धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून मुंगोली पोलिसांनी अज्ञात आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra weather: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुणे-साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना आज येलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT