Bhandra Accident  Saam Tv News
क्राईम

Bhandara Accident : दोघांनी बाईक रस्त्याच्या कडेला लावली, भरधाव डंपरची धडक; २७ वर्षीय तरुणाचा रस्त्यावरच अंत

Bhandra Accident : आशिष यास शौच लागल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली होती. शौच आटोपून तो दुचाकीवर बसत असताना अज्ञात टिप्परने जोरदार धडक दिली. त्यावेळी दुचाकीशेजारी उभा असलेला गणेश साठवणे हा बाजूला पळताना जखमी झाला.

Prashant Patil

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पालोरा येथील आठवडी बाजार घेऊन दुचाकीने गावाकडे निघालेल्या दोन युवकांना भरधाव वेगातील अज्ञात टिप्परने जोरदार धडक दिली. या घटनेत आशिष सुखराम वालदे (वय २७, रा. डोंगरदेव) याचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश डुलीचंद साठवणे (वय ४५, रा. खडकी) जखमी झाला. ही घटना पालोरा ते खडकी सिमेंट रोडवर हुडकी तलावाशेजारी घडली. जखमीवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. घटनास्थळावरून पसार झालेल्यावर प्रकरणी पोलिस ठाणे करडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडी बाजार घेऊन दोन्ही तरूण दुचाकीने खडकीकडे निघाले होते. त्यावेळी आशिष वालदे हा दुचाकी चालवित होता. तर गणेश साठवणे मागे बसला होता. दरम्यान, आशिष यास शौच लागल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली होती. शौच आटोपून तो दुचाकीवर बसत असताना अज्ञात टिप्परने जोरदार धडक दिली. त्यावेळी दुचाकीशेजारी उभा असलेला गणेश साठवणे हा बाजूला पळताना जखमी झाला. घटनेची माहिती करडी पोलिसांना तातडीने देण्यात आली. ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत जात आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक तसेच अदानी पॉवर प्लॉटमधील राखेची वाहतूक होत असते.

दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र रघुनाथ सुपल असं या अपघातात मृत्यू पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. देवधे बसस्टॉपनजीक हा अपघात घडला. ट्रक चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी पुढे आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambedkar Jayanti 2026 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार; आयुष्य घडवणारे मराठी, हिंदी- इंग्रजी भाषेतील स्टेटस वाचा

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या निवासस्थानी ११ तासांपासून ईडीची झाडाझडती

Watermelon Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर कलिंगडचा फेसपॅक कधी व कसा लावायचा? 5 सोप्या स्टेप्स

Cleaning Hacks : तुम्ही देखील कपडे धुताना जास्त डिटर्जंट वापरताय? ही चूक ठरू शकते धोकादायक

भाजपचे नवनियुक्त जिल्हामंत्र्याचे निधन; पक्षाचा अनुभवी चेहरा हरपला; राजकीय वर्तुळात हळहळ

SCROLL FOR NEXT