Young Woman Dies after Falling from 13th Floor Saam Tv News
क्राईम

पार्टीमध्ये बॉयफ्रेंडशी भांडण, उदास रील बनवलं; इमारतीच्या १३व्या मजल्यावरुन पडून नंदिनीचा मृत्यू

Young Woman Dies after Falling from 13th Floor : बंगळुरुच्या परप्पना अग्रहारा परिसरात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्राम रीलच्या नादात तरुणीचा १३व्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी अंत झाला.

Prashant Patil

बंगळूरु : इमारतीच्या १३व्या मजल्यावरुन पडून २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी तरुणी उदास होऊन रील शूट करत होती. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यरात्रीच्या सुमारास तरुणी निर्माणाधीन इमारतीमधून खाली कोसळली. आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी तरुणी इमारतीत गेली होती.

बंगळुरुच्या परप्पना अग्रहारा परिसरात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्राम रीलच्या नादात तरुणीचा १३व्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी अंत झाला. ही तरुणी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करत असताना हा प्रकार घडला. पार्टी सुरु असताना मित्र-मैत्रिणींमध्ये रिलेशनशिपवरुन वाद झाला. त्यामुळे वातावरण तापलं. मित्र परिवारासोबत वाद झाल्यानंतर तरुणी एकटीच छतावर गेली. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यासाठी ती उदास होऊन रील शूट करत होती. याचवेळी तिचा तोल गेला आणि ती लिफ्टच्या शाफ्टमध्ये कोसळली, आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

मृत पावलेली तरुणी मुळची बिहारची होती. ती बंगळुरुत कामासाठी राहत होती. एका शॉपिंग मार्टमध्ये ती काम करत होती. तरुणी इमारतीवरुन कोसळून मरण पावताच तिच्या मित्र मैत्रिणींनी तिथून पळ काढला. वादाचं कारण आणि त्यातील मृत तरुणीची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही तरुण, तरुणी निर्माणाधीन इमारतीत पार्टी करत होते. तेव्हा एक तरुणी रील रेकॉर्ड करताना छतावरुन खाली पडल्याची माहिती आग्नेय बंगळुरुच्या डीसीपी फातिमा यांनी दिली. 'मित्रमैत्रिणींमध्ये रिलेशनशिपवरुन वाद झाला की नाही, ते अद्याप स्पष्ट नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आम्ही अनैसर्गिक मृत्यूची नोंद केलेली आहे,' असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT