Crime News  yandex
क्राईम

Crime News : सततच्या संशयाला कंटाळून पत्नीने काढला पतीचा काटा, नेमकं प्रकरण काय?

Belgaum Crime News: नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून चक्क पत्नीने नवऱ्याचे तुकडे-तुकडे करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे.

Dhanshri Shintre

बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत श्रीमंत इत्नाळे याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी दरम्यान श्रीमंतच्या पत्नी सावित्रीकडे विचारणा केली असता, तिने सुरुवातीला खुनासाठी बाहेरच्या व्यक्तीला जबाबदार ठरवले.

मात्र, पोलिसांनी संशय घेत तिची कसून चौकशी केली. अखेर सावित्रीने खुनाची कबुली दिली. तिच्या कबुलीजबाबानंतर खून करण्यामागची कारणे उघडकीस आली, जे ऐकून पोलिसही थक्क झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, आणि पुढील तपास सुरू आहे. सावित्रीने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा श्रीमंत दारूच्या व्यसनात गेला होता आणि त्याने दारूसाठी सतत तिला त्रास द्यायचा. दोघांमध्ये रोज भांडणे होई आणि पैसे न दिल्यास श्रीमंत तिला मारहाण करायचा. एक दिवस श्रीमंतने बाईक खरेदी करण्याची मागणी केली होती. त्याच्या वाढत्या पैशांच्या मागणीमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे सावित्री मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती.

श्रीमंत दारूच्या आहारी गेलेला होता आणि पैशांसाठी त्याने सावित्रीवर शरीरविक्रय करण्याची जबरदस्ती केली. त्याने तिच्यावर परपुरुषांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले. घर तुटू नये म्हणून सावित्रीने हे सर्व सहन केले. मात्र, एक घटना घडली जी सावित्रीला जबरदस्त हादरवून गेली. या घटनेमुळे तिच्या मनात संतापाचा कडेलोट झाला, आणि तिने त्यावर एक अत्यंत गंभीर निर्णय घेतला. त्या दिवशी घडलेल्या घटनेने तिच्या सहनशक्तीला सीमारेषा गाठली, आणि ती चुकता चुकता एका भीषण परिणामास कारणीभूत ठरली.

श्रीमंत दारूच्या आहारी गेलेला होता आणि एकेदिवशी पोटच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने कसाबसा बचाव केला, आणि सावित्रीला या घटनेची माहिती झाल्यावर ती संतापाने पेटून उठली. तिने श्रीमंतवर हल्ला केला आणि त्याला मरेपर्यंत मारत राहिली. श्रीमंताचा मृत्यू झाल्यानंतर, सावित्रीने त्याचे शरीर तुकडे करून शेतात फेकून दिले. तीने मुलीला घटनेबद्दल कुठेही बोलू नकोस असे सांगितले. घरातील रक्ताचे डाग पुसून टाकले आणि हत्यार देखील गायब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतात पडलेला श्रीमंतचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला, ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT