Beed News Saam Tv
क्राईम

Crime News : मित्रानेच केली मित्राची हत्या; फरार झालेल्या आरोपीला १२ तासांच्या आत बेड्या

Beed News : बीड शहरातील शिवाजीनगर भागात किरकोळ वादातून धारदार हत्याराने २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींना ताब्यात घेतलं असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Alisha Khedekar

  • बीड शहरात २५ वर्षीय विजय काळे याचा धारदार हत्याराने हत्या.

  • किरकोळ वादातून घडलेली घटना; परिसरात भीती व संतापाचं वातावरण.

  • पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपींना १२ तासांत अटक केली.

  • वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण.

बीड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. शहरात मंगळवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रांमध्ये झालेल्या वादाने टोक गाठलं. संतप्त झालेल्या मित्राने विजय काळे याच्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केले. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र स्थानिक पोलिसांनी त्याला १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय काळे याचा त्याच्या शुल्लक कारणावरून मित्रांसोबत वाद झाला. संतप्त झालेल्या मित्राने विजय काळेच्या छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. एका किरकोळ कारणावरून तरुणाचे आयुष्य निर्दयपणे संपवले गेले.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात गती दाखवत अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेतले. तथापि, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला, आणि त्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात तणाव वाढून हत्येचा प्रकार घडला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

या घटनेनंतर स्वराज्य नगर आणि परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. एका तरुणाचा जीव गेला असला तरी पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने परिस्थिती अंशतः नियंत्रणात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि तरुणांमधील बिघडणारी शिस्त याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT