Sarpanch Murder Case Update Saam Tv
क्राईम

Sarpanch Murder Case Update: सरपंच हत्त्येप्रकरणी 2 मोबाईल जप्त; मोबाईलवरुन बड्या नेत्याला फोन?

Sarpanch Murder Case Update: सरपंच हत्या प्रकरणी सीआयडी पथकला महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. एका कारमधून दोन मोबाईल सापडले आहेत.

Snehil Shivaji

सरपंच हत्या प्रकरणात राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत, या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाच व्हिडिओ आणि मोबाईलवरुन एका बड्या नेत्याला फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या तपासाने आता वेग घेतलाय. या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल सीआयडीला सापडले आहेत. जप्त केलेल्या स्कॉर्पियो गाडीत हे दोन मोबाईल आढळले असून, सरपंचांना मारहाण करतानाचा व्हिडिओ या मोबाईलमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच एका बड्या नेत्याला याच मोबाईलमधून फोन केल्याचंही समोर आलं आहे.

या फोन मधून सध्या डेटा रिकवर करण्याचं काम सुरु असून आहे. याप्रकरणी अंजली दमानिया यांनी त्या बड्या नेत्याचं नाव जाहिर करण्याची मागणी केली आहे. आता हा बडा नेता कोण या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मोबाईलद्वारे फरार आरोपींनी ज्या ज्या लोकांना संपर्क केला, त्यांची चौकशी पथकाद्वारे सुरु करण्यात आली आहे.

आतापर्यंत शंभरहून जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. पण या संदर्भात कोणीतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इतकंच काय तर या प्रकरणात आरोप होत असलेला वाल्मिक कराड फरार असून सीआयडीने कराडची पत्नी मंजिली कराड यांची केज पोलीस स्थानकात दुसऱ्यांदा चौकशी केली. वाल्मिक कराडवर याच पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आता सीआयडी तपासात काय मोठा खुलासा होतो आणि सरपंच संतोष देशमुखांचे खरे मारेकरी गजाआड जायला आणखीन किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT