Majalgaon Gavran Dhaba owner killed case  Saam Tv News
क्राईम

Beed Crime : बीडमधील 'गावरान ढाबा' मालकाच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, डोक्यात वार करुन केला होता खून

Beed Majalgaon Gavran Dhaba Owner Murder : दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी महादेव गायकवाड यांचा आज सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला.

Prashant Patil

बीड : राज्यातील पुण्यानंतर आता गुन्हेगारीच्या बाबतीत बीड जिल्ह्याचं नाव आधी घेण्यात येतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बऱ्याच हत्येच्या घटना उघडकीस आली आहे. याचदरम्यान, बीडच्या माजलगाव येथील महादेव गायकवाड यांच्या हत्येचा उलगडा अखेर झालाय. बिलाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. शिवाय त्यांच्या ढाब्याची तोडफोडही करण्यात आली होती. यातील प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे (सर्व रा. आनंदगाव) यांना आज पहाटे पुण्यातील आळंदी येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे 'गावरान ढाबा' नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्यासोबत वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडी ढिल्पी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घातली. तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा देखील या मारहाणीत जबर जखमी झाला.

दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी महादेव गायकवाड यांचा आज सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे आणि अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या घटनेत कृष्णा माणिकराव थावरे आणि ऋषिकेश रमेशराव थावरे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी आज या तिघाही आरोपींना पुण्यातील नगर परिषद चौक आळंदी येथून ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT