Majalgaon Gram Panchayat member Babasaheb Aage killed by Koyta Saam Tv News
क्राईम

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! ग्रामपंचायत सदस्याची भरदिवसा हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं; थरारक VIDEO

Beed Majalgaon Youth Murder : बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील माजलगावमध्ये एक तरुण भाजप कार्यकर्त्याची तथा ग्रामपंचायत सदस्याची हत्या केली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

Prashant Patil

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अवघे काही महिनेच उलटले आहेत. पण तरीही बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरुच आहे. याचदरम्यान, बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा एका तरुणाची धारधार कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे. हत्या करणारा आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर नारायण शंकर फफाळ असं आरोपीचं नाव आहे.

माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ भर वस्तीत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. नराधमांना कायदाचा धाक उरलेला आहे की नाही? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्यासमोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. त्यानंतर सपासप वार करून त्याने भरदिवसा या तरुणाची हत्या केली. स्वतः आरोपी नारायण शंकर फफाळ हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT