Beed Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : हत्या करून रचला हृदयविकाराचा बनाव, चितेला अग्नी देणार तोच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अंत्यसंस्कारापूर्वीच नवऱ्याची पोलखोल

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात पतीने पत्नीची काठीने निर्घृण हत्या करून हृदयविकाराचा बनाव रचला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंत्यसंस्कारापूर्वीच आरोपी अटकेत.

Alisha Khedekar

  • बीडमध्ये पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

  • हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा खोटा बनाव

  • अंत्यसंस्कारापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप केला

  • आरोपी पती ताब्यात, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

बीडमध्ये शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका पतीने पत्नीचा डोक्यात काठीने वार करून निघृण हत्या केली. एव्हढ्यावरच न थांबता महिलेच्या पतीने मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला असल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या थरारक बनावाची पोल खोल झाली असून अंत्यविधीच्या पूर्वीच मृतदेहासह आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातोला शिवारात घडली आहे. शीलाबाई सुरेश शेरफुले असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश शेरफुले हा हातोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून पत्नीसह राहत होता. मागील ३-४ दिवसांपासून तो गावाकडे जाऊ म्हणून पत्नीकडे आग्रह धरत होता, पण ती तयार नव्हती. याच कारणावरून शुक्रवारी म्हणजेच २३ जानेवारी रोजी दोघांत तीव्र वाद झाला. रागाच्या भरात सुरेशने जाड भरीव काठीने शीलाबाईच्या डोक्यात एकामागून एक अनेक वार केले. या हल्ल्यात शीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुरेशने ही हत्या लपवण्यासाठी परिसरातील लोकांना आणि गावाकडे नातेवाईकांना शीलाबाईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले.

गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने तातडीने एक भाड्याची क्रुझर गाडी बुक केली आणि मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील आलुरा गाठले. मात्र, बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळाली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळ न घालवता देगलूर पोलिसांशी संपर्क साधला.

देगलूरचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाव गाठले. तिथे शीलाबाईच्या माहेरच्या लोकांनाही डोक्यावरील जखमा पाहून संशय आला होता. पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह ताब्यात घेऊन पती सुरेशला ताब्यात घेतले. सध्या संशयित आरोपी असलेला पती बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शिवाय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ये गारेगार....हार्बर रेल्वेवर १४ एसी लोकल; पनवेल ते मुंबई प्रवास सुखकर, जाणून घ्या वेळापत्रक

Ratnagiri Tourism : मन उधाण वार्‍याचे...; कोकणाच्या मातीत लपलाय 'हा' किनारा, पाहता क्षणी निसर्गाच्या प्रेमात पडाल

Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट

Dog Attack: कुत्र्यांची टोळी अंगावर धावली तर काय कराल? दुचाकी चालकांनी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT