Beed Crime: Saam Tv
क्राईम

Crime: बीड हादरले! वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार

Beed Police: बीडमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. वाल्मीक कराडच्या समर्थकानेच हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाल्मीक कराडच्या समर्थकानेच हे भयंकर कृत्य केले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बीडच्या केजमध्ये घडली. आरोपीने वाल्मीक कराडच्या सुटकेसाठी आंदोलन केले होते. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. वाल्मिक कराडचा समर्थक नानासाहेब चौरेने गावात राहणाऱ्या एका गतीमंद मुलीवर बलात्कार केला. आरोपीने बळजबरी बलात्कार करताना पिडीतेच्या नात्यातील एका महिलेने पाहिले आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीने हा प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला होता. यानंतर या महिलेने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. पिडीतेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात नानासाहेब चौरेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रात्री पोलिसांनी अटक केली.

आरोपी नानासाहेब चौरे हा वाल्मीक कराडचा समर्थक आहे. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी आरोपीने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. वाल्मीक कराडच्या समर्थकाने हे घृणास्पद कृत्य केल्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड कारागृहात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? या केंद्रीय मंत्र्याचं सूचक विधान|VIDEO

Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

SCROLL FOR NEXT