Sarpanch Santosh Deshmukh Case Accused Saam Tv
क्राईम

Santosh Deshmukh Case: कराड अडकला; पण घुले, आंधळे, सांगळे फरार, आता वॉन्टेड घोषित

Beed Crime Sarpanch Santosh Deshmukh Case Accused: संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय.

Bharat Jadhav

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोप अद्याप फरार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. या हत्याकांडातील आरोपी असलेला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलाय, मात्र या प्रकरणातील इतर तीन आरोपी अजून फरार आहेत. पोलिसांनी या तीन आरोपींना फरार घोषित केलंय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून यासंदर्भात प्रसिद्धी पत्र जारी करण्यात आले आहे.

मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सात आरोपींचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. यातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र इतर तीन आरोपी अजून फरार आहे. सरपंच हत्येतील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे.

वरील फोटोमध्ये असलेले व्यक्ती आरोपी असून त्यांच्यावर खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. हत्या झाल्यापासून हे तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलाकडून चालू आहेत. या आरोपींविषयी ठाव ठिकाणा कोणास माहिती असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.

मागील महिन्याच्या डिसेंबर महिन्यात सरपंच देशमुख यांचे अपहरण करत हत्या झाली होती. याप्रकरणात सात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. यातील ३ आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केलीय. मात्र इतर चार आरोपी फरार होते. हत्येचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराडचं बीडमधील एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याने या प्रकरणात राजकीय नेत्यांनी उड्या घेतल्या. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली.

हत्या होऊन २२ दिवस होईपर्यंत गुन्ह्यातील मारेकरी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीने ९ पथक तयार केली होती. वाल्मिक कराडसह इतर फरार आरोपींचा शोध देशभरात घेतला जात होता. सीआयडीने फरार आरोपींची आणि त्यांच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवली होती. त्यानंतर सर्व देशभरात त्यांचा शोध घेतला जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT