Beed Crime Woman Lawyer Beaten  Saam tv
क्राईम

Beed Crime: कराड, खोक्यानंतर आता सरपंचभाई; महिलेला लाठ्या काठ्यांनी मारहाण

Beed Crime Woman Lawyer Beaten: सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. पण बीडमध्ये खाकीचा खुळखुळा का झालाय? बीडमध्ये आता कोणता नवा भाई आलाय? आणि खरंच बीडचा बिहार झालाय का? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

बीडमधील कायदा सुव्यवस्थेला बट्ट्या. असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण बीडच्या रस्त्यारस्त्यात आणि गावागावात गुंडाच्या झुंडी उन्माद घालत असल्याचं वारंवार दिसतंय. आता आम्ही आपल्या जी दृष्य दाखवणार आहोत ती पाहण्याआधी एक मह्त्वाची सूचना.

तुम्ही जर काळीज हेलावणारी दृष्य पाहून भावूक होत असाल.. तुम्ही जर प्रचंड संवेदनशील असाल तर ही बातमी पाहू नका. शरीर काळं नीळ पडेपर्यंत ही मारहाण झालीये बीडमधील एका वकील महिलेला. अंबाजोगाई तालुक्याच्या सनगावात या वकील महिलेला गावातील सरपंचासह त्याच्या टोळक्यानं जेसीबीचा पाईप, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी ही अमानुष मारहाण केलीये. अवैध पद्धत्तीनं सुरु असणाऱ्यां भोंग्यांची तक्रार केली म्हणून या महिलेला सरपंचानं ही तालिबानी शिक्षा दिलीये.

राज्यात महिला सशक्तीकरणांच्या गोड गप्पा काही केल्या संपत नाही. तर तिथे बीडमध्ये सरपंचासह त्याच्या टोळक्यानं या महिलेला केलेली ही मारहाण बीडमधील खालावलेल्या कायदा सुव्यवस्थेची ग्वाही देतेय. आता वडगाव पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केलाय परंतू आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार झालेत.अजित पवारांचा करडा कडक स्वभाव उभ्या महाराष्ट्राला परिचीत आहे. परंतू अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमधील गुंड मात्र कायद्याला अजिबात भीक घालत नाही असं दिसतंय.

इतरांना न्याय मिळवून देणाऱ्या या वकील महिलेलाच झालेली मारहाण ही सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे केवळ लाडक्या बहिणीना पैसे देऊन महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या सरकारनं आता महिलांना सुरक्षा देणं गरजेचं आहे.मात्र बीडच्या पोलिसांचा असाच खुळखुळा वाजत राहिला तर लवकरच बीडचा बिहार होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT