CCTV Video saam TV
क्राईम

CCTV Video: संक्रांतीच्या दिवशीच भरबाजारात कुंभाराला मारहाण; थरारक घटनेचं दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद

Beating the Potter: संक्रांतीसाठी वानवसाला वापरल्या जाणाऱ्या सुगड्यांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्याला (कुंभाराला) एका टोळक्याने अचानक मारहाण केलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

विनोद जिरे

Beed Crime News:

बीडमधील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज मकरसंक्रात निमित्त सर्वत्र बाजारपेठा सजल्या आहेत. अनेक छोटे मोठे व्यावसायिक आपल्या मालाची विक्री करत आहेत. संक्रांतीसाठी सुगड्यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होते. या काळात होणाऱ्या व्यवसायावर कुंभाराचं पोट अवलंबून असतं. मात्र संक्रांतीच्या दिवशीच एक विचित्र घटना समोर आलीये.

बीडच्या परळी येथे ऐन संक्रांतीच्या दिवशीच शहरातल्या मुख्य बाजारपेठेत हाणामारी झाली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संक्रांतीसाठी वानवसाला वापरल्या जाणाऱ्या सुगड्यांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्याला (कुंभाराला) एका टोळक्याने अचानक मारहाण केलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बाजारपेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यान टोळक्याच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवण्यासाठी कुंभाराने एका दुकानात धाव घेतली. कुंभाराला मारहाण करतानाचे दृश्य परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. हा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परळी शहरात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं असून परळी पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आलं आहे.

आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध पडेपर्यंत केली बेदम मारहाण

पालघरमध्ये देखील अशीच एक संतापजनक घटना काल उघडकीस आली. यामध्ये आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केली. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

इयत्ता 9 वीत शिकणारा विद्यार्थी रुद्राक्ष दत्ता पागी हा जेवण घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने एक ऐवजी २ लाडू खाण्यासाठी घेतले. तेव्हा ललित अहिरे या शिक्षकाने त्याला गुराढोरा सारखी बेदम मारहाण केली. विद्यार्थी उपाशी असल्याने तो खाली कोसळला व बेशुद्ध झाला. बाहेर गेलेले अधिक्षक हे जेव्हा आश्रम शाळेत आले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांला रूग्णालयात घेऊन गेले. गरीब आदिवासी विद्यार्थी असल्याने यांच्या आई वडीलांवर दबाव टाकला जात आहे. शिक्षकांविरोधात तक्रार करु नये. मात्र नवीन शिकणारा रुद्राक्ष पागी हा शिक्षकाच्या माराने भेदरलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT