Beed Crime News Saam tv
क्राईम

Beed Crime News: स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; संशयित 2 महिलांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

Crime News: या कारवाई दरम्यान त्या ठिकाणी पुण्याहून आलेल्या 2 महिलालांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खरचं येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे का? याचा तपास आता परळी शहर पोलीस करत आहेत.

विनोद जिरे

Beed:

बीडच्या परळी शहरातील महेश कॉम्प्लेक्स परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चौकशीसाठी २ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फ्लोरा स्पा या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिची परळी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून परळी शहर पोलिसांनी फ्लोरा स्पावर धाड टाकून कारवाई केलीय. या कारवाई दरम्यान त्या ठिकाणी पुण्याहून आलेल्या 2 महिलालांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खरचं येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे का? याचा तपास आता परळी शहर पोलीस करत आहेत.

बीडमध्ये जुलै २०२३ मध्ये देखील अशीच एक घटना घडली हेती. एका कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली होती. तसेच या प्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीडमध्ये सातत्याने अशा घटना उघडकीस येत आहेत. सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Dhanush : धनुषचा बॉलिवूडचा पहिलाच चित्रपट सुपरहिट, टॉप अभिनेत्रीसोबत रोमान्स

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडकीला मिळतात फक्त ५०० रुपये; बहि‍णींचे ₹१००० का कापले?

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT