Crime News saam Digital
क्राईम

Beed Crime News: आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने केला खून; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

Beed Crime: बीडच्या (Beed) लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची (Grandmother) निर्घृण हत्या केलीये.

Ruchika Jadhav

Crime News:

तरुणाईमधील राग आणि चिडचिड मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. माणसाचा आपल्या मनावर आणि रागावर ताबा असणे गरजेचं असतं. मात्र अनेक तरुण मंडळी आपल्या मनासारखे न झाल्यास टोकाचे पाऊल उचलतता. आपल्या आई वडिलांप्रमाणेच आजी आजोबा देखील आपल्या नातवांवर खुप प्रेम करतात. आजी म्हणजे काय तर दूधावरची साय अशी माया आजी आपल्या नातवांना लावत असते. अशात बीडमधून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीडच्या (Beed) लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची (Grandmother) निर्घृण हत्या केलीये. नातवाने 72 वर्षीय आजीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आलीय. कौशल्याबाई किसन राऊत असे मयत महिलेचे नाव आहे.

नातू राहुल बाळासाहेब राऊत वय 29 याच्याशी घरात किरकोळ कारणावरून आदीचा वाद झाला होता. पुढे या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे नातवाला आजीचा खूप राग आला. त्याने याचा राग मनात धरून आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी नातवाविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या

पुण्यातही काल अशीच एक घटना समोर आली. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केली. भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारहाण करत हत्या केली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवी परिसरात ही घटना घडलीये. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT