Beed Crime News  Saam tv
क्राईम

Shocking : दोन दिवसांपूर्वी वडिलांची आत्महत्या, ज्या झाडाजवळ आयुष्य संपवलं तिथेच चिमुकलीचा मृतदेह आढळला; बीड हादरले

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील इमामपूर रोड परिसरात दुहेरी मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्यानंतर आता तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • बीडमध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

  • दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.

  • पोलिस विविध कोनातून तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

  • या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.

बीड मधून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या इमामपूर रोड परिसरात तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. धक्कदायक म्हणजे याच भागात दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जयराम बोराडे या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांची तीन वर्षीय मुलगी घरातून त्यांच्यासोबत बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर या चिमुकलीचा मागमूस लागला नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थ तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण आज सकाळी त्या परिसरातील एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार अपघात आहे, आत्महत्या आहे की यामागे कुठला गुन्हेगारी हेतू दडलेला आहे, याबाबत पोलीस विविध कोनातून तपास करत आहेत. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

जयराम बोराडे यांनी आत्महत्या का केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत का आढळला, या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या दुहेरी मृत्यूमुळे इमामपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या अंतराने वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: सरकारने काढलेला GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही: मुख्यमंत्र्यांचे विधान

Shirdi Sai Sansthan : साई मंदिर सुरक्षेसाठी आता AI चा वापर; साई संस्थानला तातडीने मिळणार गुन्हेगारांचा अलर्ट, डेटा होणार संग्रहित

Saiyaara OTT Release: थिएटर गाजवल्यानंतर अहान पांडे आणि अनीत पड्डाचा 'सैयारा' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Mumbai Metro 2: डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार, ५.३९ किमीचा मार्ग अन् ५ स्थानके; कधीपासून सुरू होणार?

बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

SCROLL FOR NEXT