Beed Crime News Saam TV
क्राईम

Beed Crime News: धक्कादायक! 8 महिन्यांच्या चिमुकलीला पोत्यात भरलं अन् रस्त्यावर फेकलं; घटनेमुळे परिसरात खळबळ

Beed News: परिसरातील एका व्यक्तीने याविषयी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 8 महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. सध्या या चिमुकल्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

विनोद जिरे

Beed:

स्त्री भ्रूणहत्येसाठी गाजलेल्या बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा मुलीला फेकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी 8 महिन्यांच्या मुलीला पोत्यात गुंडाळून परळीपासून 6 किलोमीटर अंतरावर मालेवाडी रोडवर फेकून दिलं. परिसरातील एका व्यक्तीने याविषयी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 8 महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. सध्या या चिमुकल्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एका मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं आहे. मात्र हे क्रूर कृत्य कुणी केलं हे मला माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टीमसह सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते घटनास्थळी दाखल झाले.

पाहतात तर काय ? एक साधारण 8 महिन्यांची मुलगी तिचं अर्धशरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. संबंधित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर चिमुकल्या मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले. पोटात अन्न पाणी नसल्याकारणाने चिमुकली फारच अशक्त झाली होती. मात्र उपचारानंतर तिची तब्येत चांगली होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

याप्रकरणी अद्याप परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही चिमुकली नेमकी कुणी फेकली? निदर्यी मातेनी फेकली की अन्य काही प्रकार आहे ? याचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान यामुळं परळीसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT