Beed Crime News Saam Tv
क्राईम

Beed News: धक्कादायक; चुलत्यानेच केला 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार, असा उघडकीस आला प्रकार

Beed Crime News: बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नराधमाने एका आपल्याच 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News:

बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नराधमाने एका आपल्याच 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन पीडिता ही गरोदर राहिली असून तिची प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चुलत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळाल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे जुलै 2023 मध्ये लग्न होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य लग्नाच्या कामात व्यस्त होते. यावेळी पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली होती. याच खोलीत तिचा चुलताही झोपला होता. याचदरम्यान पीडितेला धमकी देत चुलत्याने तिच्यावर अत्याचार केला. भीतीपोटी पीडितेने याबाबत कोणालाही काहीही सांगितलं नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर पीडिता ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली. सहा महिने ऊस तोडण्यात मदतही केली. दोन दिवसांपूर्वी काम संपल्याने हे सर्व लोक गावी परत येत होते. त्यावेळी पीडितेला कळा सुरू झाल्या. (Latest Marathi News)

तीला तातडीने एका रूग्णालयात दाखल केले असता तेथे सोनोग्राफी करून लगेच तिची प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीलाही जन्म दिला असून त्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटलीय. दरम्यान, नराधम चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईत फुस लावून 16 वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने केला अत्याचार

दरम्यान, नवी मुंबईतही अशीच एक घटना घडल्याची माहिती आज समोर आली. नवी मुंबईतील एका 16 वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने फूस लावून जबरदस्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavaricha Thecha Recipe: घरच्या घरी बनवा गावरान चवीचा झणझणीत गवारीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

World Largest Parad Shivling: जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा...

नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढवतात 'हे' 4 पदार्थ; निरोगी हृदयासाठी कधीच खाऊ नका

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

SCROLL FOR NEXT