Beed Breaking News:  Saamtv
क्राईम

Beed News: बीडच्या गेवराई तालुक्यात ड्रोनच्या घिरट्या; चोरी, मारहाणीच्या घटनांनी गावकरी भयभीत, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

Beed Breaking News: बीडच्या तळणेवाडी परिसरात चोरट्यांसह ड्रोनची दहशत पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

विनोद जिरे

बीड, ता. ११ ऑगस्ट २०२४

जालना जिल्ह्यामधील काही गावांमध्ये मध्यरात्री ड्रोनने घिरट्या घातल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर आता बीडमध्येही असाच प्रकार समोर आला असून बीडच्या तळणेवाडी परिसरात चोरट्यांसह ड्रोनची दहशत पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या गेवराई तालुक्यातील तळणेवाडी परिसरात चोरट्यांसह ड्रोनची दहशत पसरल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या दरम्यान ड्रोन गावावर फिरत असल्याचं गावकरी सांगत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत चार घरफोड्या झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घरफोडी करताना घरातील सदस्यांना मारहाणही करण्यात आल्याचं सांगत आहेत.

या सर्व घटनेत एक आपबीती सांगणारा व्हिडिओ गावातील सुरज एडके या तरुणाने जारी केला आहे. यामध्ये गावातील सुरज हा आपल्या घरामध्ये कशी चोरी झाली ? चोर कसे दाखल झाले ? घरातील सामानाची नासधुस, घरातील रोकड, दागिने कसे घेऊन गेले ? त्याचबरोबर मारहाणही करण्यात आल्याचं सांगत आहे..दरम्यान हे सर्व होत असताना मात्र पोलिसांचं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक

भिवंडीच्या कोनगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून केलेल्या घरफोडीतच्या गुन्ह्यातील चार आरोपींना शिताफीने अटक करून चोरीस गेलेले 8 लाख 13 हजार रुपये किमतीचे 29 मोबाईल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

SCROLL FOR NEXT