शिवसेना शहर प्रमुखाच्या बॉडीगार्डचा वाद, एकाने दुसऱ्याची बंदूक चोरली; बदलापूरात उडाली खळबळ Google
क्राईम

Crime News: शिवसेना शहर प्रमुखाच्या बॉडीगार्डचा वाद, एकाने दुसऱ्याची बंदूक चोरली; बदलापूरात उडाली खळबळ

Badlapur Crime: बदलापूरच्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे बॉडीगार्ड जजलाल पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी यांच्यातील वादामुळे तिवारीची बंदूक आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली, ज्यात पांडेने चोरी कबूल केली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूरच्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत खासगी बॉडीगार्ड म्हणून काम करणारे जजलाल बुलंद पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी यांच्यातील वाद एका गुन्ह्याला कारणीभूत ठरला. एका बॉडीगार्डने दुसऱ्या बॉडीगार्डची बंदूक चोरल्याची घटना घडली आहे. हे दोघेही शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे बॉडीगार्ड आहेत. आपसातील वादामुळे हा प्रकार केल्याची कबुली आरोपी बॉडीगार्डने दिली आहे.

14 मार्च रोजी, होळीच्या दिवशी, कृष्णाप्रसाद तिवारी ड्युटी संपवून वामन म्हात्रेंच्या एरंजाड येथील फार्महाऊसवर विश्रांती घेत होता. त्याने स्वतःची 8 काडतुसं असलेली बंदूक उशीखाली ठेवली होती. काही वेळाने तो अंघोळीला गेला, मात्र परत आल्यानंतर त्याला त्याची बंदूक आणि मोबाईल गहाळ असल्याचे लक्षात आले.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांना जजलाल पांडे याच्यावर संशय गेला. चौकशीअंती त्याने कृष्णाप्रसाद तिवारीला अडचणीत आणण्यासाठी त्याची बंदूक आणि मोबाईल लपवल्याची कबुली दिली.

पोलिसांनी जजलाल पांडेकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. कृष्णाप्रसाद तिवारीची बंदूक आणि 4 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. बॉडीगार्ड तिवारीचा मोबाईल. आरोपी जजलाल पांडेची रिव्हॉल्व्हर. 18 जिवंत काडतुसे आणि 7 रिकाम्या पुंगळ्या, आणि आरोपी पांडेचा मोबाईल अशा सर्व गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी जजलाल पांडे याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT