Akshay Shinde Encounter 
क्राईम

Akshay Shinde Encounter: आम्ही साडेचार वाजता अक्षयची भेट घेतली तेव्हा…; चकमकीच्या घटनेवर अक्षयच्या काकांचा धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू झालाय. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या या चकमकीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Bharat Jadhav

बदलापूरमधील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेतर संमिश्र प्रतिक्रिया राज्यातून येत आहेत. आज ट्रन्सिट रिमांडसाठी तळोजा तुरुंगातून बदलापूरला अक्षयला आणलं दात असताना आरोपी अक्षयचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यावर राजकारणातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता या प्रकरणावर अक्षयच्या काकांनी मोठा खुलासा केलाय.

या प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अनेक संशय दाटून येत आहेत. बदलापूर प्रकरणातील इतर आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. मात्र त्यातच अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमुळे सर्व काही दाबलं जाणार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला . यामुळे याप्रकरणात अजून काही कांगोरे आहेत का असा सवाल केला जात आहे. अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला त्यावर त्याचे काकांनी मोठा खुलासा केलाय.

काय म्हणाले अक्षयचे काका

एन्काऊंटरआधी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची कुटुंबियांशी भेट घेतली होती. या प्रकरणावर त्याच्या काकांनी सामशी बोलतांना सांगितलं की, आम्ही साडेचार वाजता अक्षयची भेट घेतली होती. अक्षय पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करणार नाही, असं अक्षय शिंदे याच्या काका म्हणालेत. आज आम्ही सकाळी साडेदहा वाजता तळोजा तुरुंगात गेलो होतो, त्यावेळी आम्हाला त्याची भेट घेण्यासाठी एक टोकन देण्यात आले.

परंतु पहिल्यावेळेस आम्हाला त्याची भेट झाली नाही. त्यानंतर साडेचार वाजता आमची आणि अक्षयची भेट झाली.तेथून पाच वाजता आम्ही तेथून निघालो. पण अक्षयला बदलापूर येथे घेऊन येणार असल्याचं माहिती दिली नाही. परंतु बंदूक हिसकावून गोळीबार करेल असे वाटत नाही.

दरम्यान आधीपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेलं हे प्रकरण चकमकीमुळे परत एकदा वादात सापडलंय. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरवरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंचऱ्यात उभे केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT