Assam Crime Saam Tv
क्राईम

Assam Crime: बेपत्ता भाजप नेते अब्दुल सत्तार मृतावस्थेत सापडले; कुटुंबियांचा स्थानिक काँग्रेस नेत्यावर आरोप

Assam Crime: भारतीय जनता पक्षाचे स्थानिक राजकारणी अब्दुल सत्तार २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.

Bharat Jadhav

Assam Crime BJP leader Abdul Sattar :

आसामधील माजी पंचायत सदस्य आणि भाजप नेते अब्दुल सत्तार यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आलाय. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. पोलिसांनी याची माहिती पोलिसांना दिलीय. पोलिसांनी त्याचा मृतदेह करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी परिसरातून ताब्यात घेतला. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक राजकारणी अब्दुल सत्तार २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. (Latest News)

सत्तार यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे शंका आहे. करीमगंज जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पार्थ प्रतिमा दास यांनीही हत्येचा संशय व्यक्त केलाय. तसेच सत्तार यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अब्दुल सत्तारच्या हत्येत स्थानिक काँग्रेस नेता सुरमन अली आणि त्याचे मित्र सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सत्तार यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार २३ ऑक्टोबर रोजी सत्ता जेव्हा घरी होते त्या रात्री ९ वाजता त्यांना अनेक कॉल आले होते. सत्तार यांना स्थानिक आमदाराच्या घरी एका महत्त्वपूर्ण बैठकीला जायचे होते. अशी माहिती कुटुंबियांना दिली. कार्यक्रमाला गेले त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांच्या कॉलही लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांना आणि इतर पक्षाच्या नेत्यांना याची माहिती देण्यात आल्याचं कुटुंबियांनी सांगितले.

मृत सत्तार यांच्या मुलाने पत्रकरांना दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी सत्तार यांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या गटाने धमकावले होते. तर सत्तार यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तार यांचे हात-पाय बांधलेले होते. तसेच त्यांचा मृतदेह एका गोणीत भरलेला होता. त्याची हत्या करून त्याचा मृतदेह मोठ्या दगडांसह नदीत फेकण्यात आला होता. दरम्यान पाथरकांडीचे भाजप आमदार कृष्णेंदू पॉल यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT