Andheri Crime News Saam TV
क्राईम

Andheri Crime News: कस्टम अधिकारी असल्याचं सांगत ९ कोटी रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

Crime News: मी कस्टम अधिकारी आहे असं सांगत एका टोळक्याने तब्बल ९ कोटींची फसवणूक केलीये. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai Crime News:

मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात फसवणूकीची एक मोठी घटना समोर आलीये. कस्टम अधिकारी आहे असं सांगत एका टोळक्याने तब्बल ९ कोटींची फसवणूक केलीये. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली असून २ जण फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेतायत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वेगवेगळी नावे धारण करून आणि स्वतःची ओळख कस्टम अधिकारी तसेच पब्लिक प्रॉसिक्यूटर असं सांगून व्यक्तींना लुबाडण्याचं काम एका टोळक्याने हाती घेतलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केलेलं सोनं लिलावात स्वस्तात उपलब्ध करून देणार असं आश्वासन देऊन टोळक्याने करोडोंची फसवणूक केली. या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत एका महिला आरोपीला अटक केलीये.

नूतन प्रसाद आयरे व त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून आरोपींनी तब्बल ९ कोटी ८६ लाख ५० हजार रुपये घेतले होते. स्वस्तात जास्तीत जास्त सोनं मिळवून देणार असं आश्वासन देत हे पैसे घेतले होते. मात्र फिर्यादींना सोनं किंवा गुंतवलेले पैसे देखील परत मिळाले नाही.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी एका महिला आरोपीला पुणे येथून अटक केलीये. तर तिच्या इतर दोन साथीदारांचा शोध नगर पोलीस घेत आहेत.

श्वेता अनिल बडगुजर (56 वर्षे) अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून दर्शन देसाई व स्वाती प्रकाश जावकर अशी दोन फरार आरोपींची नावे असून नगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT