Amravati Crime saam tv
क्राईम

Shocking News : अमरावती हादरली! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा, प्रेम संबंधामुळे नवऱ्याने घात केला

Amravati Crime : अमरावतीत महिला पोलीस अंबलदार आशा धुळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमागे त्यांचा पती असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • अमरावतीतील महिला पोलीस अंबलदार आशा धुळे यांची हत्या त्यांच्या पतीनेच केली.

  • आरोपी राहुल तायडे याने पाच लाखांची सुपारी देत खुनाचा कट रचला होता.

  • पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून इतर दोन आरोपी फरार आहेत.

  • खुनामागे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध आणि घरगुती वाद हे प्रमुख कारण होते.

अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील महिला पोलीस अंबलदार आशा धुळे (तायडे) यांच्या खून प्रकरणाने अमरावती शहर हादरले आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या त्यांच्या पतीनेच रचलेल्या कटात करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली आहे.

तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. आशा धुळे या स्वतः पोलीस खात्यात कार्यरत होत्या, तर त्यांचे पती राहुल तायडे हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयीन पदावर कार्यरत होते. या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. या वादातूनच ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.

कशी झाली महिला पोलिसाची हत्या ?

राहुल तायडे याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. यापूर्वीही आशा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तरीही हा त्रास सुरूच राहिला. अखेर एक महिना आधी राहुलने पत्नीच्या हत्येचा कट रचला. दोन मित्रांच्या मदतीने त्यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला.

इतकेच नव्हे, तर तपास चुकवण्यासाठी त्यांनी चोरीचा बनावही रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहुल तायडे याने पत्नीच्या हत्येसाठी दोघा मित्रांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. यामध्ये २५ हजार रुपयांचा ॲडव्हान्सही देण्यात आला होता. सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास फ्रेजरपुरा पोलिसांकडून सुरू असून, आरोपी पतीच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अशा प्रकारे झालेल्या हत्येमुळे पोलीस खात्यात शोककळा पसरली आहे.

आशा धुळे यांच्या खुनामागे नेमकं काय कारण होतं?

पती राहुल तायडे याचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध होते, यावरून सतत वाद होत होते.

आरोपीने खुनाचा कट कधी रचला होता?

आरोपीने एक महिना आधीच खुनाचा कट रचून दोन मित्रांना सुपारी दिली होती.

सुपारी किती होती आणि किती अ‍ॅडव्हान्स देण्यात आला?

पाच लाख रुपयांची सुपारी ठरवली गेली होती, त्यातील २५ हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्स देण्यात आला होता.

पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

फ्रेजरपुरा पोलिसांनी पती राहुल तायडे याला अटक केली असून दोघे साथीदार अद्याप फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT