Amravati Crime News:  Saamtv
क्राईम

Amravati Crime: एकाच तरुणावर दोघींचा जीव जडला! तरुणीने सपासप वार करुन दुसरीला संपवलं; बॉयफ्रेंडसाठी भयंकर कांड

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती

गेल्या चार दिवसांपासून अमरावती शहरामध्ये खूनांच्या घटनांचे सत्र सुरु आहे. शहरातील विविध भागात चार हत्येच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अशातच आता आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. अमरावतीच्या राजापेठ ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय युवतीचा निर्घृण खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुहेरी प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुहेरी प्रेमप्रकरणातून २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अमरावतीमध्ये घडली आहे. एकाच मुलावर दोन मुलींचा जीव जडला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने आपल्या प्रेमप्रकरणतील अडथळा दूर करण्यासाठी दुसऱ्या तरुणीला चाकूने वार करुन संपवले. शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे.

शुभांगी काळे (वय, २६) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हत्या करणारी तरुणी घटनास्थळावरुन फरार झाली आहे. शुभांगी काळे आणि हत्या करणाऱ्या तरुणीचे विकास सुरज या तरुणाशी प्रेमसंबंध होते. आरोपी तरुणीला विकास सुरज आणि शुभांगी काळेच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाली. याच रागातून आरोपी तरुणीने शुभांगीची भेट घेतली यावेळी झालेल्या वादातून आरोपी तरुणीने तिच्यावर चाकूने वार करत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान,अमरावती पोलीस आयुक्तालयात गेल्या 24 तासात 4 खून झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडालेली आहे. अमरावतीच्या महाजनपुरा रहिवासी प्रेमराज ऊर्फ मोंटू गोळे व अजय वानखडे या दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एका घटनेत बडनेरा येथे मजहर नावाच्या युवकावर त्याच्या 2 मित्रांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशातच आता या आणखी एका हत्येच्या घटनेने अमरावती शहर हादरुन गेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaarud Movie : एका भयानक रात्रीचं गूढ उलघडायला येतोय 'गारुड'; स्वप्नांच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट

पायात केवळ चांदीचे पैंजण का घालतात? सोन्याचे का नाही?

Marathi News Live Updates: कोल्हापुरात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Grah Gochar: पुढचे ४ दिवस ४ ग्रहांचं होणार बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशींच्या व्यक्ती करणार पैशांची डबल कमाई

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाताना अपघात; २९ महिलांना घेऊन जाणारी एसटी बस ५० फूट दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT