Ambarnath Crime News Saam tv
क्राईम

Ambarnath Crime: अंबरनाथमध्ये झालेल्या हत्येचा उलघडा! मुळशीमधून आरोपी अटकेत; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Latest News: सचिन भोसले याने काढलेल्या टर्म लाइफ इन्शुरन्सचे पैसे हा आरोपी प्रविण भरत होता तसेच सचिनने काही पैसे हे प्रविणकडून उधार घेतले होते. यावरुनच त्यांच्यामध्ये वाद झाला.

अजय दुधाणे

अंबरनाथ, ता. १२ जुलै २०२४

अंबरनाथमधील ऑर्डनस फॅक्टरीच्या अंबर चौकात २३ जूनच्या रात्री एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, जावसई येथे राहणारा सचिन भोसले याची २३ जुनच्या रात्री अंबरनाथमधील ऑर्डनस फॅक्टरीच्या अंबर चौकात त्याचा गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला होता.

फुटेजच्या आधारे ओळख पटवून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून आरोपी प्रविण चिंतोडिया याला अटक केली आहे. सचिन भोसले याने काढलेल्या टर्म लाइफ इन्शुरन्सचे पैसे हा आरोपी प्रविण भरत होता तसेच सचिनने काही पैसे हे प्रविणकडून उधार घेतले होते. टर्म लाइफ इन्शुरन्स आणि उधार घेतलेले पैसे प्रवीणने सचिनकडे मागितले होते.

मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या सचिनकडे प्रविणला देण्यासाठी पैसे नव्हते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि प्रविणने सचिनच्या गळ्यावर चाकू भोसकून त्याची हत्या केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पत्रकारांना दिली. याप्रकरणी आरोपी प्रविणला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT