Akola Crime Saam Tv
क्राईम

Akola Crime News: रस्त्यावर आढळले दोन मृतदेह; अकोल्यातील खळबळजनक घटना

Dead Bodies Found In Akola: अकोल्यात दोन व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akola Crime Dead Bodies Found

अकोल्यामध्ये दोन व्यक्तींचे मृतदेह (dead bodies) आढळले आहेत. हे मृतदेह ३५ वर्षीय आणि ६५ वर्षीय व्यक्तींचे आहेत. या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ (Akola Crime News) या.  (Latest Crime News)

अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील चौहटा बाजार भागात हे मृतदेह आढळून आले ( dead bodies found in Akola) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार समाधान शंकर ढिगे (वय 65) आणि निलेश राणे (35) असं मृतकांची नावे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार समाधान यांचा रस्त्यावर पुलावरुन खाली पडून मृत्यू झाला असावा, तर निलेश राणे यांनी कौटुंबिक कलहातून विषप्राशन करून आत्महत्या केली (Akola News) असावी, अशी शक्यता वर्तवली आहे.

दोघांच्या मृत्यूचं मूळ कारण अद्याप समोर आलं नाहीय. या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवली जातेय. या प्रकरणी अधिक तपास दहीहंडा पोलीस करीत आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

पोलीस तपास सुरू

दरम्यान निलेश राणे हे मूळ रोहणा गावातील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी बेपत्ता झाली होती. त्यांनी या संदर्भात दहीहंडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली (Crime News) होती.

आता निलेश राणे यांचाच मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला (Akola Crime) जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

SCROLL FOR NEXT