Crime News Saam Tv
क्राईम

Ahmednagar Crime: जन्मदात्या आईचे सैतानी कृत्य! प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलांनाच संपवलं; प्रियकराच्या मदतीने शेततळ्यात बुडवून घेतला जीव

Ahmednagar Breaking News: मुलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. नातेवाईकांच्या संशयावरुन पोलिसांनीही याप्रकरणत सखोल तपास सुरू केला. ज्यानंतर खळबळजनक खुलासा झाला आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २० जून २०२४

दोन महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घडली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या दोन्ही मुलांचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेच्या दोन महिन्यानंतर उघड झालेल्या या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे ( वय 12 वर्ष) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय 8 वर्ष ) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र मुलांच्या नातेवाईकांना याबाबत वेगळीच शंका होती.

वर्षभर अगोदर या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती. मुलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. नातेवाईकांच्या संशयावरुन पोलिसांनीही याप्रकरणत सखोल तपास सुरू केला. ज्यानंतर या प्रकरणात सर्वात खळबळजनक खुलासा झाला.

पोलिसांनी सखोल तपास केला असता मुलांची आई कविता सारंगधर पावसे हिचे सचिन बाबाजी गाडे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. या प्रेमसंबंधात मुले अडसर ठरत असल्यानेच आईने प्रियकर सचिन बाबाजी गाडे याच्या मदतीने आपल्या मुलांना शेततळ्यात बुडवून मारल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना गजाआड केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT