Ahilyanagar Sitaram Sarda School Student Murder Saam Tv News
क्राईम

Crime News : अहिल्यानगर हादरलं! आठवीतल्या विद्यार्थ्याचा दहावीतल्या विद्यार्थ्यावर शाळेतच सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

Ahilyanagar Sitaram Sarda School Student Murder : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सिताराम सरडा विद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचीच हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सिताराम सरडा विद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचीच हत्या केल्याचं समोर आलं आहे. शाळेच्या आवारातच आठवीमध्ये शिकत असलेल्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यावर हल्ला केला होता. त्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारारार्थी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद मुस्तकीन शेख असं मृत मुलाचं नाव आहे. या घटनेनं शाळेसह आजूबाजूच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हिंगोलीत हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या मित्रांवर जीवघेणा हल्ला

रात्रीच्या सुमारास दोघे मित्र हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये टेबलावर बसले असताना तीन जणांनी जीवघेणा हल्ला करत चाकूने वार केले. यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना वसमत तालुक्यात घडली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा याठिकाणी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. या घटनेत विशाल देवरे (वय २२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ओमकार नरवाडे हा तरुण गंभीर जखमी आहे. दरम्यान विशाल आणि ओमकार हे दोघेजण रात्रीच्या सुमारास हयातनगर फाटा येथे एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. ते दोघे टेबलावर बसले असतानाच ही घटना घडली.

हॉटेलमध्ये बसले असताना विशाल आणि ओमकार या दोन तरुणांवर तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यामध्ये विशाल याचा जागीच मृत्यू झाला. तर ओमकार हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत तपासाला सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

Maharashtra Dam : राज्यातील धरणांत ८५ टक्के साठा, मराठवाडा ते कोकण, कुठे किती जलसाठा?

भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

SCROLL FOR NEXT