Ahilyanagar Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : धक्कादायक! वर्ग शिक्षकाची विद्यार्थिनींवर वाईट नजर, ४ अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये वर्ग शिक्षकाविरोधात चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • श्रीरामपूरमध्ये वर्ग शिक्षकाविरोधात चार अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराचा आरोप

  • विद्यार्थिनीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले

  • आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली

  • महिला अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरू

  • घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

कुटुंबियानंतर लहान मुले सगळ्यात जास्त सुरक्षित शाळेत म्हणजेच विद्येच्या मंदिरात असतात. मात्र याचं विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. बदलापूरमध्ये काल परवा घडलेली घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वर्ग शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि संबंधित शिक्षकाने इतर तीन ते चार विद्यार्थींसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार उघड झाला. नराधम शिक्षकाविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे.

सचिन गोणारकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून या नराधम शिक्षकाने आणखी असे काही प्रकार केलेत का? याची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन विद्यार्थिनींवर वर्ग शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT