acb arrests sambhajinagar smart city officer rushikesh ingle in bribe case Saam tv
क्राईम

Sambhajinagar : 7 लाखाचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेतली, संभाजीनगर स्मार्ट सिटी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापकाला अटक

sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर शहरामधील साई एजन्सीला स्मार्ट सिटी बस स्वच्छतेचे कंत्राट मिळाले आहे. या एजन्सीचे गत 4 महिन्यांचे बिल थकले होते.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या स्मार्ट सिटी बस स्वच्छतेच्या ठेकेदराची चार महिन्याचे सुमारे सात लाखाचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना स्मार्ट सिटीच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ऋषिकेश श्रीरंग इंगळे असे लाच घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्याला अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर शहरामधील साई एजन्सीला स्मार्ट सिटी बस स्वच्छतेचे कंत्राट मिळाले आहे. या एजन्सीचे गत 4 महिन्यांचे बिल थकले होते. हे बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली.

ऋषिकेश इंगळे यांनी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याला लाच घेताना एसीबीने पकडले. त्यानंतर त्याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT