pramod jenekar saam tv
क्राईम

Gadchiroli News : पाच लाखांच्या लाच प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला अटक

तडजोड अंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News :

रस्ते बांधकामावरील पकडलेल्या वाहनांवर ठोठावलेला 72 लाखांचा दंड कमी करण्यासाठी 10 लाखांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (gadchiroli acb) रंगेहाथ अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा प्रमोद आनंदराव जेणेकर असे लाच घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे एसीबीने नमूद केले. (Maharashtra News)

प्रमोद जेणेकर आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा कंत्राटदार आहे.

त्याचे पेरमीली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी या कामावरील वाहने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांनी पकडली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले 72 लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान एसीबीने जेणेकर यास अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात, कांदिवली-बोरिवीलीदरम्यान घडली घटना

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Talasari Tourism: मुंबईच्या गोंगाटातून फक्त २ तासांत पोहोचा थेट निसर्गाच्या मिठीत; स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

Crime : घराची मालकीण मुलीला चहा देऊन बेशुद्ध करायची, तिचा मुलगा मित्रांसह अत्याचार करायचा; ७ महिन्यांनंतर...

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

SCROLL FOR NEXT