Nandurbar Crime Saam tv
क्राईम

Crime: घरात घुसले अन् जबरदस्ती विष पाजलं, तरुणाने मित्रांच्या मदतीने १६ वर्षीय गर्लफ्रेंडला संपवलं; नंदुरबार हादरले

Nandrurabar Crime: नंदुरबारमध्ये घरामध्ये घुसून तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला जबरदस्ती विष पाजून तिची हत्या केली. मित्रांच्या मदतीने त्याने हे कांड केले. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

Priya More

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबारमध्ये तरुणाने आपल्या १६ वर्षीय गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. एखाद्या एखाद्या चित्रपटामध्ये घडतं त्याप्रमाणे ही घटना घडली. या घटनेमुळे नंदुरबार हादरले आहे. ३ महिन्यांपूर्वी ही मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. पण तीन महिन्यांनंतर तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या घरी आणून सोडले. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने गर्लफ्रेंडची विष पाजून हत्या केली. या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा पांगरपाड्यात ही घटना घडली. याठिकाणी १६ वर्षीय मुलीची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली. घरामध्ये झोपलेल्या या मुलीला तिचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांनी जबरदस्ती विष पाजले. या घटनेत या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा हादरला आहे.

गमनचा पांगरपाडा येथे राहणारी अल्पवयीन मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरातून पळून गेली होती. तीन महिने दोघे एकत्र राहिले. पण नुकताच तिच्या बॉयफ्रेंडने तिला तिच्या घरी आणून सोडले. तरुणाने या मुलीला परत आमच्या घरी येऊ नको अशी ताकीद दिली होती. मुलगी आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत होते.

या मुलीच्या बॉयफ्रेंडने आपल्या काही मित्रांसोबत या मुलीचे घर गाठले. झोपेत असतानाच त्यांनी तिला जबरदस्तीने विष पाजले आणि तिची हत्या केली. या प्रकरणी मोलगी पोलिस ठाण्यात बॉयफ्रेंडसह चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या मुलीच्या हत्येमागचे नेमकं कारण काय होतं? आणि प्रियकराने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT